Open an Account

डिमॅट खाते म्हणजे काय - डिमॅट खात्याचे प्रकार आणि फायदे

Created :  Author :  Samco Securities Category :  , Basics of stock market, Everything about Investing

PDF

डिमॅट खाते म्हणजे काय? जर तुम्ही शेअर बाजारात नवखे असाल आणि डीमॅट खाते म्हणजे काय याचे तुम्हाला कुतूहल वाटत असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. दर महिन्याला, जवळपास लाखो लोक हाच प्रश्न विचारतात – डीमॅट खाते म्हणजे काय? यात ‘ट्रेडिंग खाते म्हणजे काय?’ डीमॅट खात्याचे विविध प्रकार कोणते आहेत?’, ‘डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते यात काय फरक आहे?, अशा उपप्रश्नांचा समावेश होतो. आणि यादी वाढतच जाते. शेअर बाजारात नवखे म्हणून, बाजारातील औपचारिकता तुम्हाला  किचकट किंवा त्रासदायक वाटू शकते. पण तरीही, तुम्हाला डिमॅट खाते कसे उघडायचे हे माहित असणे आवश्यक आहे. का? कारण डिमॅट खात्याशिवाय तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकत नाही. तर, डीमॅट खाते म्हणजे काय आणि डीमॅट खाते तुम्हाला शेअर बाजारात संपत्ती निर्माण करण्यात सक्षम करण्यासाठी कसे कार्य करते हे समजून घेऊ.

या लेखात आम्ही समावेश केला आहे :

डिमॅट खाते म्हणजे काय? - डीमॅट खात्याची ओळख

डीमॅट खाते काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा बँक खाते तुमची रोख रक्कम आणि मुदत ठेवी, आवर्ती ठेवी इत्यादी इतर मालमत्ता साठवते, बरोबर? त्याच प्रकारे, डिमॅट खाते हे एक डिजिटल लॉकर (तिजोरी) आहे जे तुमची आर्थिक मालमत्ता ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपात साठवते. डीमॅट खाते शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) इत्यादी मालमत्ता साठवते. डीमॅट हा शब्द डीमटेरियलायझेशन खात्यासाठी संक्षिप्त रुपआहे. डीमटेरियलायझेशन म्हणजे काय? ही भौतिक शेअर्सचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही पहा, भारतात 1996 मध्ये डिमॅट खाती सुरू झाली. त्यापूर्वी, भौतिक शेअर प्रमाणपत्रांची  गुंतवणूकदारांमध्ये खरेदी-विक्री केली जात होती. तर, समजा तुम्ही 1992 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 100 शेअर्स खरेदी केले. कंपनीने तुम्हाला वास्तविक फिजिकल पेपर शेअर्स पाठवले असते. जर तुम्हाला हे शेअर्स विकायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या ब्रोकरला फिजिकल शेअर सर्टिफिकेट द्यावे लागे जो नंतर खरेदीदार शोधात असे. एकदा विकल्यानंतर, ब्रोकर प्रत्यक्ष शेअर प्रमाणपत्र खरेदीदारास देत असे आणि पैसे तुमच्या खात्यात जमा केले जात. त्यामुळे, डीमटेरिअलायझेशनपूर्वी, तुम्ही खरेच शेअर्स तुमच्या हातात धरू शकत होतात! परंतु साहजिकच, ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, चोरी होण्याची शक्यता, नुकसान, बनावट प्रमाणपत्रे, आणि मोजता येणार नाही अशा धोक्याच्या शक्यता आहेत.  पंजाबमध्ये बसलेल्या विक्रेत्याने चेन्नईच्या खरेदीदाराला आपला शेअर्स विकल्यास किती कुरिअर चार्जेस आकारावे लागतील याची तुम्ही कल्पना करू शकता का? प्रचंड! मग यात आश्चर्य नाही की डीमॅट खात्यांपूर्वी, सेटलमेंट सायकलला कामकाजाचे 14 दिवस लागायचे! पण 1996 मध्ये भारतीय बाजारपेठांनी ‘डीमटेरियलायझेशन’ स्वीकारल्याने सर्व काही बदलले. डिमटेरिअलायझेशनमुळे, सेटलमेंट सायकल  कामकाजाच्या 14 वरून 2 दिवसांवर आले. डीमॅट खात्यामुळे शेअर बाजारातील व्यापारात वाढ झाली. शेअर बाजाराचा आवाका वाढला. आज, भारतातील अगदी दुर्गम खेड्यात बसलेली व्यक्ती डीमॅट खात्याद्वारे शेअर बाजारात व्यापार करू शकते.

डिमॅट खात्यात कोणते ‘सिक्युरिटीज’ साठवले जाऊ शकतात?

अनेक नवशिक्या गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की डिमॅट खाते हे फक्त शेअर्स साठवण्यासाठी असते. हे खरे नाही. तुम्ही डिमॅट खात्यात खालील मालमत्ता देखील ठेवू शकता:

ट्रेडिंग खाते म्हणजे काय?

अननुभवी गुंतवणूकदारांसाठी हे आणखी एक गोंधळाचे क्षेत्र आहे. डीमॅट आणि ट्रेडिंग खाते सारखेच नाही. ट्रेडिंग खाते सिक्युरिटीज खरेदी आणि विक्रीसाठी वापरले जाते तर डीमॅट खाते फक्त तुमच्या सिक्युरिटीज साठवते. डिमॅट खाते वापरून तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी, तुम्हाला अनिवार्यपणे ट्रेडिंग खाते आवश्यक आहे. या सोप्या उदाहरणाने डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते यातील फरक समजून घेऊ. नवीन स्नीकर्स खरेदी करण्यासाठी तुम्ही बुटांच्या दुकानात जाता. तुम्ही त्यांना वापरून पहाताआणि खरेदी करण्याचा निर्णय घेता. तुम्ही पेमेंट काउंटरकडे जाताना सेल्समन ओरडतो, ‘छोटू पॅक पीस दे’. आणि एक पॅक केलेला बॉक्स आकाशातून पडतो! (ओव्हरहेड गोडाऊन मधून). पहा खरेदी आणि विक्री बुटाच्या दुकानात होत आहे. मात्र खरे शूज गोडाऊनमध्ये  साठवलेले आहेत. प्रत्येक वेळी ग्राहकाने बूट खरेदी केल्यावर गोडाऊनमधून नवीन बॉक्स दिला जातो [ अधिक वाचा: डीमॅट खाते विरुद्ध ट्रेडिंग खाते ] या उदाहरणा तील, गोडाऊन हे तुमचे डीमॅट खाते आहे आणि बुटाचे दुकान हे तुमचे ट्रेडिंग खाते आहे आता या टप्प्यावर, तुमच्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याबद्दल काही प्रश्न असू शकतात. त्यांना एक एक करून उत्तर देऊ या.

तुम्ही फक्त डिमॅट खाते उघडू शकता का?

होय, तुम्ही ट्रेडिंग खाते न उघडता डीमॅट खाते उघडू शकता. परंतु हे केवळ तेव्हाच केले पाहिजे जेव्हा तुम्ही कधीही तुमचे स्टॉक विकण्याची योजना करत नसाल. त्यामुळे, जर तुम्ही फक्त स्टॉक विकत घेतले असाल आणि तुम्हाला खात्री असेल की तुम्ही ते 10 किंवा 20 वर्षे विकणार नाही, तर तुम्ही ट्रेडिंग खात्याशिवाय फक्त डीमॅट खाते उघडू शकता.

तुम्ही फक्त ट्रेडिंग खाते उघडू शकता?

होय, तुम्ही डीमॅट खाते न उघडता फक्त ट्रेडिंग खाते उघडू शकता. परंतु त्या बाबतीत, तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) विभागामध्येच व्यापार करू शकता कारण ते रोखीने सेटल केलेले आहेत. ट्रेडिंग खात्याशिवाय, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही. सक्तीचे नसले तरी शेअर ट्रेडिंग आणि सेटलमेंट सहज होण्यासाठी एकाच ब्रोकरकडे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते दोन्ही असण्याची शिफारस केली जाते.

तुम्ही अनेक डिमॅट खाती उघडू शकता का?

होय नक्कीच ! तुम्ही किती डिमॅट खाती उघडू शकता यावर कोणतेही बंधन नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक डीमॅट खात्यासाठी तुम्हाला वेगळे वार्षिक देखभाल शुल्क भरावे लागेल. [अधिक वाचा: भारतातील डीमॅट खाते शुल्कांबद्दल सर्वकाही] आता तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडिंग खाते म्हणजे काय हे समजले आहे, तर आपण डीमॅट खात्याच्या कार्यक्षम कामकाजात मदत करणारे विविध सहभागीदार पाहू. भारतातील सर्व डिमॅट खाती डिपॉझिटरीजद्वारे राखली जातात.

डिपॉझिटरीज म्हणजे काय?

डिपॉझिटरी ही तुमच्या बँकेसारखी एक संस्था आहे. तुमच्या सर्व सिक्युरिटीज (शेअर, बॉण्ड इ.) या डिपॉझिटरीजमध्ये सुरक्षितपणे साठवले जातात. डिपॉझिटरीजची मुख्य भूमिका म्हणजे सिक्युरिटीज एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करणे. हे तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासारखेच आहे. बँकेच्या शाखा असतात तसे, डिपॉझिटरीमध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपीज) असतात. भारतातील दोन मुख्य डिपॉझिटरीज आहेत: एनएसडीएल ही जगातील सर्वात मोठ्या डिपॉझिटरीजपैकी एक आहे. 1996 च्या डिपॉझिटरीज कायद्यांतर्गत ऑगस्ट 1996 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. एनएसडीएलकडे जवळपास 2.70 कोटी सक्रिय ग्राहक खाती असलेले 276 नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपीज) आहेत. एनएसडीएलचे एकूण डिमॅट कस्टडी मूल्य तब्बल 2,93,20,536 कोटी रुपये आहे.

डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे काय?

तुमचा ब्रोकर हा तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे. एक गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही डीमॅट खाते उघडण्यासाठी थेट एनएसडीएल  किंवा सीडीएसएलशी संपर्क साधू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या ब्रोकरकडे डीमॅट खाते उघडू शकता. तो तुम्हीआणि डिपॉझिटरीमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. सॅमको सिक्युरिटीज लिमिटेड ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिपॉझिटरी सहभागींपैकी एक आहे ज्याचे 2.5 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. डिपॉझिटरी पार्टिसिपंट तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग खाते वापरून शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यात मदत करतो.

भारतात डिमॅट खात्यांचे प्रकार कोणते आहेत?

भारतात 3 मुख्य प्रकारची डीमॅट खाती असतात. हे विभाजन तुम्ही निवासी भारतीय (आरआय) किंवा अनिवासी भारतीय (एनआरआय) यावर आधारित आहे.   रेग्युलर डीमॅट खाते: हे भारतातील सर्वात सामान्य प्रकारचे डीमॅट खाते आहे. हे डिमॅट खाते सर्व निवासी भारतीय उघडू शकतात. तुम्ही सिंगल किंवा जॉइंट होल्डिंगमध्ये रेग्युलर डीमॅट खाते उघडू शकता. तुम्ही जॉइंट डीमॅट खाते उघडल्यास, ते 'ईदर ऑर सर्वायव्हर' मोडमध्ये असू शकत नाही. जास्तीत जास्त तीन धारकांना जॉइंट डीमॅट खाते उघडण्याची परवानगी आहे. तुम्ही मायनर (18 वर्षाखालील व्यक्ती) च्या नावाने देखील डिमॅट खाते उघडू शकता. पालकांपैकी कोणीही पालक म्हणून काम करू शकतात. परंतु मूल 'मेजर' झाल्यावर खाते 'मेजर' किंवा सिंगल खात्यामध्ये बदलून घेतले पाहिजे. भारतात मायनर डिमॅट खाते कसे उघडायचे ते शिका. रीपॅट्रिएबल डीमॅट खाते: रीपॅट्रिएबल डीमॅट खाते तुम्हाला परदेशात निधी हस्तांतरित करण्याची परवानगी देते.  हे अशाअनिवासी भारतीयांसाठी योग्य आहे ज्यांना भारतीय बाजारपेठांमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु नफा किंवा कमाई परदेशात न्यायाची आहे. रीपॅट्रिएबल डिमॅट खाते उघडण्यासाठी, तुम्हाला एनआरई बँक खाते आवश्यक असेल. रीपॅट्रिएबल डिमॅट खाती परकीय चलन व्यवस्थापन कायदा (एफईएमए) द्वारे नियंत्रित केली जातात. सर्व ब्रोकर्स रीपॅट्रिएबल डीमॅट खाती देत नाहीत. ते फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्दिष्ट केलेल्या अधिकृत ब्रोकर्सबरोबर उघडले जाऊ शकतात. नॉन रीपॅट्रिएबल डीमॅट खाते: अनिवासी भारतीयांसाठी नॉन रीपॅट्रिएबल डीमॅट खाते देखील आहे. परंतु तुम्ही परदेशात निधी परत हस्तांतरित करू शकत नाही. नॉन रीपॅट्रिएबल डिमॅट खाते उघडण्यासाठी, तुमचे नॉन रेसिडेंटऑर्डिनरी (एनआरओ) बँक खाते असणे आवश्यक आहे. [अधिक वाचा: 3 सोप्या चरणांमध्ये डीमॅट खाते कसे उघडायचे ते शिका] भारतातील डिमॅट खात्यांचे हे तीन मुख्य प्रकार आहेत. पण ‘बेसिक सर्व्हिसेस डीमॅट अकाउंट’ (बीएसडीए) नावाचे एक विशेष प्रकारचे डिमॅट खाते असते. बीएसडीए हा रेग्युलर डीमॅट खात्याचा एक प्रकार आहे परंतु त्यात कोणतेही किंवा कमी वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) लागते किंवा कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क  लागत नाही. खालील निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीच बीएसडीएची निवड करू शकतात:

डिमॅट खाते कसे चालते? – डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते

हे असे प्रश्न आहेत जे बहुसंख्य गुंतवणूकदार जेव्हा व्यापार सुरू करतात तेव्हा त्यांना पडतात. नियम सोपा आहे: ‘तुम्ही डीमॅट खाते वापरून शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाही’. उदाहरणार्थ: समजा तुम्ही आंयपीओमध्ये सहभाग घेतला आणि तुम्हाला 100 शेअर्स मिळाले आहेत. हे शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात ‘स्टोअर’ केले जातील. एका महिन्यानंतर तुम्हाला हे 100 शेअर्स विकायचे आहेत. परंतु तुमच्याकडे ट्रेडिंग खाते नाही. तुम्ही हे शेअर्स विकू शकाल का? नाही. तुम्ही केवळ ट्रेडिंग खात्याद्वारे शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकता. डिमॅट खाते तुमच्या सिक्युरिटीजसाठी फक्त 'लॉकर' म्हणून काम करते.

डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचा फ्लो - खरेदीची ऑर्डर देणे

तुम्ही खरेदीची ऑर्डर देता तेव्हा डीमॅट आणि ट्रेडिंग खाते कसे कार्य करते ते समजून घेऊ या.
  1. रामने इन्फोसिस लि. चे 100 शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 12 मे 2022 रोजी शेअरची किंमत 1,509.70 रुपये आहे.
  2. राम त्याच्या बँक खात्यातून 1,50,970 रुपये त्याच्या ट्रेडिंग खात्यात ट्रान्सफर करतो.
  3. तो त्याच्या ट्रेडिंग खात्यात लॉग इन करतो आणि खरेदीची ऑर्डर देतो.
  4. स्टॉक एक्स्चेंज रामसाठी विक्रेता शोधतो. एकदा विक्रेता सापडला की, खरेदी ऑर्डर अंमलात आणली जाते.
  5. आता रामच्या ट्रेडिंग खात्यातून 1,50,970 रुपये डेबिट केले जातील आणि एक्सचेंजला दिले जातील.
  6. एक्सचेंज विक्रेत्याकडून 100 इन्फोसिस शेअर्स गोळा करेल आणि त्या बदल्यात त्याला 1,50,970 रुपये हस्तांतरित करेल.
  7. एक्स्चेंज रामच्या डीमॅट खात्यात 100 इन्फोसिस समभाग जमा करेल. हे शेअर्स रामच्या डीमॅट खात्यात टी+2 दिवसांत हस्तांतरित केले जातात. हे सेटलमेंट सायकल म्हणून ओळखले जाते.
तुम्ही शेअर्स खरेदी करता तेव्हा डिमॅट खाते अशा प्रकारे काम करते. ही प्रक्रिया क्लिष्ट वाटू शकते, परंतु ती चांगल्या तेलपाणी केलेल्या  मशीनप्रमाणे काम करते. ऑर्डर मॅचिंग काही सेकंदात होते. लक्षात ठेवा, राम त्याचे 'ट्रेडिंग खाते' शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरतो पण स्टॉक एक्सचेंज शेअर्स त्याच्या 'डीमॅट अकाउंट'मध्ये 'स्टोअर्स' (क्रेडिट्स) करते. हीच प्रक्रिया विक्रेत्यासाठीही होईल.

डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचा फ्लो - विक्री ऑर्डर देणे

विक्री ऑर्डरच्या बाबतीत डीमॅट खाते कसे कार्य करते ते पाहू.
  1. श्यामला इन्फोसिसचे 100 शेअर्स 1,509.70 रुपयांना विकायचे आहेत.
  2. तो शेअर्स विकत असल्याने त्याला त्याच्या ट्रेडिंग खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची आवश्यकता नाही.
  3. श्याम त्याच्या ट्रेडिंग टर्मिनलवर जातो आणि विक्रीची ऑर्डर देतो.
  4. एक्सचेंज ही ऑर्डर रामच्या खरेदीच्या ऑर्डरशी जुळवते.
  5. डिपॉझिटरी श्यामच्या डिमॅट खात्यातून 100 शेअर्स घेते (डेबिट) आणि ते रामच्या डिमॅट खात्यात जमा करते.
  6. त्याचप्रमाणे, ते रामच्या ट्रेडिंग खात्यातून 1,50,970 रुपये डेबिट करते आणि श्यामच्या ट्रेडिंग खात्यात 1,50,970 रुपये जमा करते.

खरेदीदार

विक्रेता

डीमॅट खात्यात शेअर्स जमा झाले डीमॅट खात्यातून शेअर्स डेबिट केले
ट्रेडिंग खात्यातून शेअर्सची किंमत  डेबिट केली. ट्रेडिंग खात्यात विक्री किंमत जमा केली
आम्हाला आशा आहे की यामुळे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते कसे कार्य करते याविषयी तुमच्या कोणत्याही शंकांचे निराकरण होईल. आता डिमॅट खात्याचे फायदे आणि तोटे समजून घेऊ.

तुम्ही डीमॅट खाते का उघडावे? - डीमॅट खात्याचे शीर्ष 10 फायदे

छोटे उत्तर असे की तुम्ही डीमॅट खात्याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये भाग घेऊ शकत नाही. होय, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसइबीआय ) नुसार, भारतीय शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. डीमॅट खाते उघडण्याचे इतर फायदे असे आहेत:
  1. तुमच्या सर्व आर्थिक मालमत्तेसाठी स्टोरेजची एक जागा: डिमॅट खाते फक्त स्टॉक्स साठवण्यापेक्षा बरेच काही करते. हे तुमचे म्युच्युअल फंड, सरकारी रोखे, ईटीएफ इत्यादी सर्व एकाच ठिकाणी संग्रहित करते. हे  यासाठी योग्य आहे की तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य जाणून घेण्यासाठी भिन्न खाती ठेवण्याची किंवा अनेक ब्रोकर्सशी समन्वय साधण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या डीमॅट खात्यात लॉग इन करून तुमच्या सर्व आर्थिक मालमत्तेचे वर्तमान मूल्य जाणून घेऊ शकता.
  2. सुलभ आणि जलद सेटलमेंट: 1996 पूर्वी, सर्व व्यवहार भौतिकरित्या सेटल केले जात होते. शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रोकरला रोख रक्कम द्यावी लागत होती. त्यानंतर तो विक्रेता शोधण्यासाठी स्टॉक एक्सचेंजमध्ये जात असे. त्याचप्रमाणे, विक्रेता ब्रोकरला भौतिक शेअर प्रमाणपत्रे देत असे  आणि तो  बाजारात खरेदीदार शोधात असे. जेव्हा दोन्ही ब्रोकर भेटत तेव्हा व्यवहार ‘दलाली’ केला जात असे. या संपूर्ण प्रक्रियेला 14 दिवस लागत होते. परंतु डीमॅट खात्यांमुळे, सर्व सेटलमेंट टी+2 दिवसांत होतात. टी म्हणजे व्यवहाराची तारीख. उदाहरणार्थ: तुम्ही सोमवारी शेअर्स विकत घेतल्यास, ते बुधवारी संध्याकाळपर्यंत तुमच्या डीमॅट खात्यात जमा होतील. हे केवळ डीमटेरियलायझेशनमुळेच शक्य झाले आहे.
  3. चोरी, नुकसान किंवा बनावट शेअर सर्टिफिकेटचा धोका नाही: प्रत्यक्ष शेअर्स सहज चोरी होत किंवा हरवत. बाजारात बनावट शेअर्स विकले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. परंतु डीमॅट खात्यांमुळे, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट' हे सुनिश्चित करतात की हस्तांतरित सिक्युरिटीज 'अस्सल' आहेत.
  4. सुलभ तरलता: डीमॅट खात्यांद्वारे, तुम्ही एक्सचेंजवर काही सेकंदात शेअर्स सहज विकू शकता. भौतिक सेटलमेंटमध्ये  हे शक्य नव्हते. तुमच्या ब्रोकरला प्रत्यक्षरित्या विक्रेता शोधून सौदा करावा लागत असे. या प्रक्रियेला अनेक दिवस लागत होते! परंतु डीमॅट खात्यांद्वारे, तुम्ही तुमच्या सिक्युरिटीज सहज विकू शकता आणि त्यांच्यावर कर्ज देखील मिळवू शकता. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या सिक्युरिटीजवर बँका सहज कर्ज देतात.
  5. कॉस्ट-एफिशिएंट: कमी खर्च हा डीमॅट खात्यांचा एक प्रमुख फायदा आहे. पूर्वी गुंतवणूकदारांना जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. पण आता गुंतवणूकदारांना शेअर्सच्या हस्तांतरणासाठी फक्त 015% मुद्रांक शुल्क भरावे लागते.
  6. हस्तांतरणाची सुलभता: डीमॅट खात्यामुळे, खातेदाराच्या मृत्यूच्या बाबतीत मालमत्ता जवळच्या नातेवाईकांना हस्तांतरित करणे सोपे होते. जेव्हा शेअर्स फिजिकल फॉर्ममध्ये होते तेव्हा हे खूप कठीण होते. मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी कायदेशीर वारसांना विविध कायदेशीर मार्गांनी जावे लागत असे. यामुळे भावनिक, शारीरिक आणि आर्थिक तणाव निर्माण होत असे. परंतु डीमॅट खात्यांमुळे, मालमत्ता विनाव्यत्यय कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित केली जाऊ शकते.
  7. ‘ऑड लॉट्स’ची समस्या नाही: डीमॅट खात्यांपूर्वी शेअर्सची खरेदी-विक्री सामान्यतः लॉटमध्ये होत असे. तेव्हा तुम्ही एकल शेअर खरेदी करू किंवा विकू शकत नव्हता. उदाहरणार्थ: जर तुम्हाला इन्फोसिसचा 1 शेअर विकत घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमचे डीमॅट खाते वापरून ते आज सहज खरेदी करू शकता. पण 1996 पूर्वी, तुम्हाला एकतर संपूर्ण लॉट विकत घ्यावा लागत होता किंवा काहीही खरेदी करता नव्हते!
  8. वांदा (वाईट) सौद्यांचे निर्मूलन: भौतिक शेअर ट्रेडिंगमध्ये खूप काम हाताने करावे लागते. याचा परिणाम म्हणून मानवी चुका होऊ शकत ज्याला वांदा सौदा देखील म्हणतात. डिमॅट खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वांदा सौदा संपुष्टात आला.
  9. माहितीसाठी एका जागीअपडेट: याआधी, तुम्ही तुमचा निवासी पत्ता, फोन नंबर किंवा ईमेल आयडी बदलल्यास, तुम्हाला अनेक कंपन्यांना कळवावे लागे. परंतु डीमॅट खात्याद्वारे, तुम्ही तुमचे नो युअर क्लायंट (केवायसी) रेकॉर्ड एका मध्यवर्ती ठिकाणी अपडेट करू शकता आणि ते तुमच्या सर्व स्टॉक होल्डिंगमध्ये अपडेट केले जाईल.
  10. सुलभ लेखा आणि व्यवस्थापन: डीमटेरीयलायझेशनपूर्वी, गुंतवणूकदार त्यांच्या डीमॅट स्टेटमेंट्समध्ये ताळमेळ साधण्यासाठी तासनतास आणि दिवस घालवायचे. कर मोजणे हे एक दुःस्वप्न होते. आता ही स्थिती राहिलेली नाही. डीमॅट खात्यासाठी, तुमचा ब्रोकर तुम्हाला तुमचे समेट केलेले डीमॅट स्टेटमेंट दर महिन्याला पाठवतो.

तुम्ही डिमॅट खाते उघडावे का? - डीमॅट खात्याचा मुख्य तोटा

  1. उच्च डीमॅट शुल्क: डीमॅट खात्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे डीमॅट खाते उघडणे आणि चालवण्याकरिता लागणारा खर्च. पारंपारिक ब्रोकर फक्त डीमॅट खाते उघडण्यासाठी 400 रुपये आकारतात. सॅमको सिक्युरिटीज सारखे डिस्काउंट ब्रोकर मोफत डिमॅट खाते उघडण्याची सुविधा देतात. त्यामुळे तुम्हाला 400 रुपयांचा फायदा त्वरित मिळेल. याव्यतिरिक्त, डिस्काउंट ब्रोकर फ्लॅट ब्रोकरेज आकारतात ज्यामुळे 98% ब्रोकरेज बचत होते!उच्च डीमॅट शुल्क टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सॅमको सिक्युरिटीज सारख्या ब्रोकर्सबरोबर विनामूल्य डीमॅट खाते उघडणे. सॅमकोने पहिल्या वर्षी एएमसी देखील माफ केले आहे! तर, तुम्ही प्रत्यक्षात मोफत ट्रेडिंग करत आहात.
  2. उच्च मंथन: डीमॅट खात्यांपूर्वी इंट्राडे ट्रेडिंग लोकप्रिय नव्हते. गुंतवणूकदार अनेकदा दीर्घ मुदतीसाठी शेअर्स खरेदी करत असत. परंतु डीमॅट खात्याद्वारे, व्यापाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. गुंतवणूकदार  ट्रेडिंगमध्ये जास्त व्यापारात गुंतले आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत नाहीत. याला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत विभागणे.
  3. टेक्नॉलॉजी सॅव्ही: डीमॅट खात्यांच्या परिचयामुळे ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये क्रांती झाली. ब्रोकरच्या कार्यालयाची जागा संगणकांनी घेतली. इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल असलेले प्रत्येकजण आणि कोणीही व्यापार सुरू केला. परंतु टेक्नॉलॉजी सॅव्ही नसलेल्या गुंतवणूकदारांना याचा फटका बसला. सुदैवाने, सॅमको सिक्युरिटीज सारखे ब्रोकर आहेत जे उच्च तंत्रज्ञान ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करतात जे वापरकर्त्यासाठी अनुकूल आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, डीमॅट खात्यांचेही तोटे आहेत. पण सुदैवाने, डीमॅट खात्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले पाहिजे. पण डिमॅट खाते कसे उघडायचे? डीमॅट खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीमॅट खाते कोण उघडू शकते? आपण शोधून काढू या.

डिमॅट खाते कोण उघडू शकते?

18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती डीमॅट खाते उघडू शकते. भारतीय वंशाची व्यक्ती (पीआयओ) सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर कोणत्याही देशाची नागरिक असली तरीही डीमॅट खाते उघडू शकते. याव्यतिरिक्त, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयुएफ) आणि देशांतर्गत भारतीय कंपन्या देखील डीमॅट खाते उघडू शकतात. एचयूएफच्या बाबतीत, डीमॅट खाते सर्वात अधिक वयाचा पुरुष सदस्य किंवा कर्ता यांच्या नावाने उघडले जाऊ शकते. डिमॅट खाते कसे उघडायचे? डीमॅट खाते कसे उघडायचे?- 2022 मध्ये डीमॅट खाते कसे उघडायचे याबद्दल स्टेप-बाय-स्टेप गाईड स्टेप 1: ब्रोकर निवडा आता तुम्हाला माहीत आहे की ब्रोकरसोबत डिमॅट खाते उघडले जाऊ शकते, ज्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) असेही म्हणतात. भारतीय बाजारपेठांमध्ये ब्रोकर्सचा पूर आला आहे. परंतु डीमॅट खाते उघडण्यासाठी ब्रोकर निवडण्यापूर्वी, तुम्हाला खालील गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे: एकदा तुम्ही ब्रोकर निवडल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे डीमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संकलित करणे. स्टेप 2: डीमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे डीमॅट खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. स्टेप 3: डीमॅट खाते उघडण्याचा फॉर्म भरा डीमॅट खाते उघडण्याचा अर्ज भरा आणि वर नमूद केलेली कागदपत्रे दाखल करा. 24-48 तासांमध्ये तुमचे डीमॅट खाते सक्रिय होईल. सॅमको सिक्युरिटीज सारखे ब्रोकर्स 3-इन-1 खाते ऑफर करतात. तर, तुम्हाला एक डिमॅट, ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड खाते मिळेल! स्टेप 4: तुमच्या ट्रेडिंग खात्याला निधी द्या एकदा तुमचे डीमॅट खाते उघडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग खात्यात (तुमच्या बँक खात्याशी सल्लग्न केलेले) निधी देणे आणि व्यापार सुरू करणे आवश्यक आहे! हे इतके सोपे आहे*. *सोपे: अनेक पारंपारिक ब्रोकर अजूनही प्रत्यक्ष स्वरूपातील फॉर्म आणि वैयक्तिक पडताळणीसाठी त्यांच्या कार्यालयात जाण्याचा आग्रह धरतात. खाते उघडण्याच्या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात. अशा ब्रोकर्सना टाळण्याची शिफारस केली जाते आणि सॅमको सिक्युरिटीज सारख्या डिस्काउंट ब्रोकरकडे डीमॅट खाते उघडण्याची शिफारस केली जाते जो तुम्हाला 5 मिनिटांच्या आत 0% लिखापढीसह विनामूल्य डीमॅट खाते उघडण्यास मदत करतो.