शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्यासाठी तुम्हाला शेअर बाजाराच्या वेळा माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक असाल तर तुम्ही भारतीय शेअर बाजाराच्या वेळेची सर्वोत्तम आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी योग्य अशी जागा निवडली आहे.
भारतीय शेअर बाजारात काही ठरविक वेळेत व्यापार करता येऊ शकतो . तसेच सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना दलाल कंपनी मार्फत व्यवहार करणे बंधनकारक आहे. हे व्यवहार शेअर बाजार सकाळी ९.१५ वाजता उघडल्यावर करता येऊ शकतात. सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांमध्ये दुपारी ३.३0 वाजता शेअर बाजार बंद होतो. त्यामुळे त्या वेळेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण केले गेले पाहिजेत.
राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. सर्वाधिक इच्छुक गुंतवणूकदार त्यांचा पैसा प्रामुख्याने अशा सिक्युरिटीजच्या खरेदी अथवा विक्रीसाठी वापरतात ज्यांची नोंद ह्या एक्सचेंज मध्ये आहे. या दोन्ही शेअर बाजारांच्या वेळा सारख्या आहेत.
भारतातील शेअर बाजाराच्या वेळा
भारतीय शेअर बाजार तीन मुख्य उपश्रेणींमध्ये विभागला गेला आहे. त्या उपश्रेणी खालील प्रमाणे आहेत:
शेअर बाजार उघडण्या आधीची वेळ
शेअर बाजार उघडण्या आधीचे सत्र सकाळी ९ वाजता सुरु होते आणि ते ९.१५ पर्यंत असते. कोणत्याही सिक्युरिटीजच्या खरेदी किंवा विक्रीच्या ऑर्डर्स ह्याच वेळात पूर्ण कराव्या लागतात. शेअर बाजार उघडण्या आधीचे सत्र तीन भागात विभागले गेले आहे.
- सकाळी ९ ते ९.०८
या वेळात कोणत्याही व्यवहाराच्या ऑर्डर्स लावता येतात. व्यापार सुरु झाल्यानंतर व्यापाराच्या वेळेनुसार ऑर्डर्सना प्राधान्य दिले जाते. या सत्रात आवश्यकतेनुसार ऑर्डर्स रद्द करता अथवा बदलता येऊ शकतात. याव्यतिरिक्त शेअर बाजार उघडण्या पूर्वीच्या सत्रात कोणत्याही ऑर्डर्स टाकता येऊ शकत नाहीत.
- सकाळी ९.०८ ते ९.१२
भारतीय शेअर बाजारात या सत्रात सिक्युरिटीजच्या किमती ठरवल्या जातात. सिक्युरिटीजची खरेदी अथवा विक्री करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये पुरेसे व्यवहार केले जावेत ह्यासाठी मागणी आणि पुरवठा यांच्याशी संबंधित किंमतींची जुळणी केली जाते. भारतीय शेअर बाजारात कोणत्या किमतीला व्यापार सुरू होईल ते बहुपक्षीय ऑर्डर मॅचिंग प्रणाली नुसार निश्चित केले जाते.
या सत्रादरम्यान आधी लावलेल्या कोणत्याही ऑर्डरमध्ये फेरफार करता येत नाही.
- सकाळी ९.१२ ते ९.१५
या सत्राला सामान्य भारतीय शेअर बाजाराची वेळ आणि शेअर बाजार उघडण्या आधीची वेळ यामधील संक्रमण कालावधी मानला जातो. या कालावधीत कोणत्याही अतिरिक्त ऑर्डर्स लावता येऊ शकत नाहीत आणि आधीच्या बोली देखील रद्द केल्या जाऊ शकत नाहीत.
सामान्य सत्र
सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० ही भारतीय शेअर बाजाराची प्राथमिक वेळ मानली जाते. ऑर्डर मॅचिंग प्रणाली नुसार या वेळात व्यवहार पूर्ण केले जातात. पुरवठा आणि मागणीच्या आधाराने किंमत निश्चित केली जाते.
द्विपक्षीय ऑर्डर्स अस्थिर असू असतात आणि त्यामुळे चढउतारांची शक्यता असते. अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी मल्टी-ऑर्डर प्रणाली शेअर बाजार उघडण्या पुर्वीच्या सत्रात सुरू करण्यात आली आणि भारतीय शेअर बाजारात वापरण्यात आली.
शेअर बाजार बंद झाल्यानंतरचे सत्र
भारतीय शेअर बाजार दुपारी ३.३० वाजता बंद होतो. ह्या सत्रानंतर शेअर बाजारात कोणतीही देवाणघेवाण होऊ शकत नाही ह्याची नोंद घ्यावी. परंतु शेअर बाजार बंद होतानाची किंमत ह्या वेळात निश्चित केली जाऊ शकते. ह्याचा फायदा दुसऱ्या दिवशी शेअर बाजार उघडताना सिक्युरिटीजची किंमत ठरवण्यासाठी होतो.
भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ
भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ दोन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. त्या वेळा खालील प्रमाणे आहेत:
- दुपारी ३.३० ते ३.४०
ह्या सत्रात शेअर बाजार बंद होतानाची किंमत स्टॉक एक्स्चेंज मध्ये दुपारी ३ ते ३.३० मधल्या सुक्युरिटीज व्यापाराच्या सरासरी किंमतीनुसार ठरवण्यात येते. एस अँड पी ऑटो, सेन्सेक्स, निफ्टी इत्यादी निर्देशकांची शेअर बाजार बंद होतानाची किंमत निर्धारित करण्यासाठी सूचीबद्ध सिक्युरिटीजच्या भारित सरासरी किमतींचा विचार केला जातो.
- दुपारी ३.४० ते ४
हा कालावधी शेअर बाजार बंद झाल्यानंतरचा कालावधी मानला जातो जेव्हा पुढील दिवसांसाठी बोली लावता येते. लावलेल्या बोली शेअर बाजारात पुरेशा खरेदीदार आणि विक्रेत्यांना प्रदान केल्या जाऊ शकतात आणि ते या सत्रात करता येऊ शकते. शेअर बाजार उघडतानाच्या किमतीतील बदलांची पर्वा न करता सर्व व्यवहार ठरलेल्या किमतीला पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेअर बाजार उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या एकूण वेळा खाली नमूद केल्या आहेत.
अनुक्रमांक | नाव | वेळ |
१ | शेअर बाजार उघडण्या पूर्वीची वेळ | सकाळी ९ ते ९.१५ |
२ | सामान्य सत्र | सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० |
३ | समापन सत्र | दुपारी ३.३० ते ४ |
आफ्टरमार्केट ऑर्डर्स (शेअर बाजार बंद झाल्यानंतरच्या ऑर्डर्स)
दिलेली मुदत संपल्यानंतर कोणतेही व्यवहार होऊ शकत नाहीत ह्याची नोंद घ्यावी. परंतु गुंतवणूकदार त्यांनी निवडलेल्या विशिष्ट कंपन्यांच्या सिक्युरिटीजसाठी आफ्टरमार्केट ऑर्डर टाकू शकतात. ह्या ऑर्डर्स पुढील दिवशी शेअर बाजार उडताना असलेल्या किमती नुसार त्यांना दिल्या जातात.
भारतीय शेअर बाजाराचे सत्र सामान्यतः दिवाळीच्या दिवशी कोणत्याही व्यवहारासाठी बंद असते कारण हा धार्मिक सण आहे आणि तो देशभर साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळी निमित्त शेअर बाजार एक तास सुरू असतो. एक व्यापार सत्र आयोजित केले जाते कारण ते तज्ञांनी शुभ मानले आहे.
निष्कर्ष
आम्ही भारतातील शेअर बाजाराच्या वेळा सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. परंतु जर तुम्ही शेअर बाजारातील नवीन किंवा जुने गुंतवणूकदार असाल, तर सॅमको सिक्युरिटीज तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यास सदैव तयार आहे. तुम्ही आता मोफत डिमॅट खाते उघडू शकता (डिमॅट खाते मोफत उघडा) अथवा तुम्ही आधी पासूनचे गुंतवणूकदार असल्यास ते खाते वापरू शकता. तेव्हा सॅमको सिक्युरिटीजमध्ये तुमच्यासाठी असंख्य व्यापाराच्या संधी वाट पाहत असताना आणखी विलंब करू नका.
Leave A Comment?