2023 मध्ये आता खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉक

Best Long Term Stocks

या लेखात खालील मुद्दे नमूद केले आहेत

  • दीर्घ मुदतीसाठी स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करावी
  • आता भारतात खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉकची यादी
  • मॉडेल पोर्टफोलिओमधील स्टॉकचे तपशीलवार प्रोफाइल, साधक आणि बाधक
  • सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉकचे तपशीलवार विहंगावलोकन
  • सर्वोत्कृष्ट दीर्घकालीन स्टॉक कसा निवडावा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा
  • सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉक्सचे मॉडेल पोर्टफोलिओ
  • खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉकसाठी विविध पॅरामीटर्ससह तपशीलवार सारणी

दीर्घ काळासाठी स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करावी

गुंतवणूकदारांना अनेकदा दीर्घकाळासाठी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांना चक्रवाढ वाढीचा फायदा घेता येईल. चक्रवाढीची शक्ती ही एक अशी महत्त्वाची संकल्पना आहे जी दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चक्रवाढ हा गुणात्मक प्रभावासारखाच असतो कारण प्रारंभिक भांडवला द्वारे मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळते. त्यामुळे गुंतवणुकीचे मूल्य जोड दराऐवजी गुणाकार दराने वाढते. परताव्याचा दर जितका जास्त असेल तेवढ्या प्रमाणात प्रगती होते आणि संपत्ती वाढवता येते. उदाहरण द्यायचे झाले तर, १०% दराने एका वर्षी फक्त ₹१ लाखाची गुंतवणूक २० वर्षांसाठी केली तर गुंतवणूक ₹६.७२ लाख पर्यंत वाढू शकते आणि भांडवलावर ६७२% चा अभूतपूर्व परतावा मिळवून देऊ शकते. कंपन्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे असून हा नफा आणखी वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तथापि विविध धोरणे आणि निर्णयांमुळे त्यांचा विकासाचा मार्ग सुकर होतो. या एका घटकामुळे चांगल्या आणि वाईट कंपन्या,फायदेशीर आणि नफा नसलेल्या कंपन्या यामध्ये फरक करता येतो. फायदेशीर कंपन्या त्यांच्या भागधारकांसाठी पुरेपूर परतावा मिळवून देतात. कंपनीची वाढ केवळ व्यापामुळे नाही तर कार्यक्षमतेमुळे होते आणि ही एक टप्प्याटप्याने होणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापनाच्या धोरणांमुळे वाढीचा मार्ग तयार होतो किंवा खंडित होतो आणि गुंतवणूकदार म्हणून आपण सदैव कंपनीच्या व्यवसाय मॉडेलचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यवसाय चालवताना व्यापक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी धोरण, व्याजदर, भागधारकांचे दावे (कर्ज आणि इक्विटी धारकांसह) यासारखे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ज्या उद्योगात आहे त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. भविष्यात कंपनीच्या वाढीसाठी पुरेशी मागणी असेल का याचे विश्लेषण करण्यासाठी गुंतवणूकदाराने उद्योग पुढे जाऊन कसा आकार घेईल याचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ:  एफ एम सी जी सेक्टर हे एक असे क्षेत्र आहे ज्याने अभूतपूर्व वाढ अनुभवली आहे. भारत हा एक विकसनशील देश आहे ज्यामध्ये प्रचंड विकासाची शक्यता आहे. देशातील शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि मानवी भांडवलाचा विकास याचा यामध्ये समावेश आहे. देशाने निव्वळ प्राप्ती मध्ये वाढ अनुभवल्यामुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर वाढला आणि ब्रिटानिया सारख्या कंपन्यांना त्याचा फायदा झाला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने २०१० मध्ये ब्रिटानिया मध्ये ₹१९६ प्रति शेअर दराने गुंतवणूक केली असती, तर त्याला १० वर्षात १९४०% परतावा मिळाला असता. ही चक्रवाढीची ताकद आहे. त्यामुळे जर उद्योग वाढण्याची शक्यता असेल आणि इतर सर्व गोष्टी बरोबर आणि खात्रीशीर पद्धतीनी मांडल्या असतील, तर त्या क्षेत्रातील योग्य मुलभूत तत्त्वे असलेल्या कंपनी मध्ये देखील वाढ होण्याची जास्त शक्यता असते. भारताची जसजशी या क्षेत्रात प्रगती सुरू आहे तसतसा कंपनीचा नफा त्यांच्या क्षमता आणि कार्यक्षमतेनुसार वाढत राहतो. एचडीएफसी बँक ची अशीच एक यशस्वी कहाणी आहे. बँकिंग क्षेत्रामुळे देशातील आर्थिक क्षेत्रात विलक्षणीय वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्रात वाढ झाल्यामुळे तसेच ते नियमित झाल्यामुळे बँकिंग स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात अवाक दिसू लागली आणि ते वेगाने वाढले. एचडीएफसी बँक हा याच वाढीतील एक भाग होता ज्याच्या चार्ट मध्ये सतत वरच्या दिशेनी वाटचाल सुरु होती. त्याच्या महसूल २०१० मध्ये ₹१६,३१४ कोटी होता. तो २०२० मध्ये ₹१,२२,१८९ कोटी पर्यंत वाढला आहे. चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) सुमारे २५% वाढला आहे, तर स्टॉक ₹२१० प्रति शेअर वरून ₹१३८५ वर पोहोचला आहे. १० वर्षांमध्ये सुमारे ६६०% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेला लाभांश वगळून एवढी वाढ झाली आहे. या उदाहरणामुळे लक्षात येते कि एखादी कंपनी त्यांच्या भागधारकांसाठी मजबूत परतावा मिळवून देण्यासाठी क्रमाक्रमाने कशी वाढते. एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला लहान चढउतारांकडे दुर्लक्ष करून संयमाने या संपूर्ण वाढीचा फायदा घेता आला पाहिजे. म्हणून जेव्हा एखादी कंपनी आपला व्यवसाय स्थापित करते आणि तो वाढवते, तेव्हा त्यांच्या स्टॉकचे मूल्य वाढते. यामुळे कंपनीसोबत दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या भागधारकांना याचा फायदा मिळतो.
क्र. क्र कंपनीचे नाव एन एस ई कोड बी एस ई कोड सीएमपी (26 Dec'22) रेटिंग
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस 532540  ₹ 3,253 5
आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआयबँक 532174  ₹ 892 4
बजाज फायनान्स बजफायनान्स 500034  ₹ 6,434 5
गोदरेज कन्स्युमर प्रॉडक्ट्स गोदरेजसीपी 532424  ₹ 878 3
आयटीसी आयटीसी 500875  ₹ 335 4.5
कॅपलीन पॉईंट लॅब्स कॅपलीपॉईंट 524742  ₹ 707 3
मारिको मारिको 531642  ₹ 518 4.5
अवंती फीड्स अवंतीफीड 512573  ₹ 385 2
एचसीएल टेकनॉलॉजिज एचसीएलटेक 532281  ₹ 1,032 4
१० बजाज ऑटो बजाजऑटो 532977  ₹ 3,557 5
११ केइआय इंडस्ट्रीज केइआय 517569  ₹ 1,489 0.5
१२ पॉलिकॅब इंडिया पॉलिकॅब 542652  ₹ 2,587 3
१३ कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल 506395  ₹ 873 3
१४ एम्फसिस एम्फसिस 526299  ₹ 1,916 3
१५ अलेम्बिक फार्मा एपीएलएलटीडी 533573  ₹ 582 0.5
१६ ओरॅकल फायनान्शिअल सर्विसेस सॉफ्टवेअर ओएफएसएस 532466  ₹ 3,004 4
१७ टाटा एलक्सी टाटाएलक्सी 500408  ₹ 6,257 3
१८ डिक्सन टेक्नॉलॉजीस डिक्सन 540699  ₹ 3,829 2
१९ हिंदुस्तान एरोनॉटिक्स एचएएल 541154  ₹ 2,527 0.5
२० एपीएल अपोलो ट्युब्स एपीएलअपोलो 533758  ₹ 1,059 3
खुशाल झवेरीसोबत दीर्घकालीन स्टॉक्स कसे पिकवायचे यावरील राईट चॉइसेसचा विथ ओरॅकल्स ऑफ़ दलाल स्ट्रीटच्या भाग तुम्ही पाहू शकता.

आदर्श पोर्टफोलिओ मधील स्टॉक्सचे तपशीलवार प्रोफाइल, साधक आणि बाधक

कंपनीच्या क्षेत्र/उद्योग विभागाचे मूल्यांकन करा

गुंतवणूकदाराने प्रथम कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्राकडे पाहणे आवश्यक आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे कारण ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे त्या क्षेत्रात गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. बाजारात विस्तार केल्यामुळे, त्यात अजून जास्त शिरल्यामुळे अथवा दोन्हीमुळे प्रचंड वाढीची शक्यता वाढते. जर या क्षेत्राचा विस्तार होत असताना कालांतराने किंमत वाढवण्यासाठी जास्त वाव मिळाला तर त्याचा फायदा पुढे जाऊन कंपन्यांना होईल. गुंतवणुकदाराने या क्षेत्रातील सहभागींची संख्या आणि स्पर्धेच्या तीव्रतेचे मूल्यांकन करून विकासाच्या संधी आणि पुढे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांचेही मूल्यांकन केले पाहिजे. असे काही उद्योग आहेत ज्यांच्या प्रवेशासाठी कमी अडथळे आहेत. जेथे व्यवसाय स्थापित करणे आणि स्पर्धा करणे सोपे आहे. जर उद्योगाच्या व्याप्तीत जास्त वाढीची क्षमता असेल तर असंख्य भागीदार फायदेशीरपणे एकत्र टिकून राहू शकतात. याचे उदाहरण म्हणजे एफएमसीजी उद्योग, जेथे उत्पादनांची विस्तृत श्रेणी पुरवणारे स्पर्धक मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. तरी देखील असंख्य कंपन्या येथे प्रवेश करून विस्तार करू शकतात तसेच सर्वजण या क्षेत्रात फायदा मिळवून टिकून राहू शकतात. परिपक्व, कमी-वाढीच्या उद्योगात कमी भागीदार असले तरी प्रतिस्पर्ध्यांच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम होतो.

मूल्य प्रदान करण्याची उद्योग क्षमता

तीव्र स्पर्धा असलेल्या उद्योगातील कंपन्यांना नफा मिळवणे जास्त मुश्कील असते. त्यामुळे अशा कंपन्यांचा शोध घेणे जास्त श्रेयस्कर आहे ज्या दिलेल्या क्षेत्रात अव्वल स्थानावर पोचतात, प्रगतीच्या दिशेने योग्य मार्गक्रमण करू शकतात आणि स्पर्धा असूनही ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. तसेच, अशा कंपन्यांचा शोध घ्या ज्यांच्यामध्ये कमी वाढीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ: टेलीकॉम कम्पनीज [दूरसंचार कंपन्यांनी] संभाषणा बरोबरच इंटरनेट आणि त्याच्याशी निगडित सेवा पुरवायला सुरुवात केल्यापासून नवीन उत्पन्नाचा प्रवाह निर्माण झाला. तसेच संपूर्ण क्षेत्रात आणि इतर अनेक संधींमध्ये वाढ झाली. अशा कंपन्या शोधा ज्या त्या क्षेत्रातील इतर भागीदारांच्या तुलनेत सतत स्पर्धात्मक फायदे मिळवण्यास सक्षम आहेत. जास्त वाढीच्या उद्योगांमधील कंपन्यांमध्ये परिपक्व उद्योगांमधील कंपन्यांपेक्षा वाढीची जास्त चांगली संभावना असते. हा मुद्दा देशील लक्षात घेण्यासारखा आहे की जास्त संधी असलेला उद्योग जास्त स्पर्धा आकर्षित करतो. उपलब्ध संधीचा लाभ घेण्यासाठी उद्योग क्षमता आणि स्पर्धात्मक तीव्रता या दोन विरोधाभासी घटकांमधील संतुलनाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

नियमन आणि अवलंबित्व पातळी

संबंधित क्षेत्रात नियमन पातळी किती आहे हे गुंतवणूकदारांनी तपासणे आवश्यक आहे. कंपनीच्या आधी ग्राहक आणि सरकारच्या हिताचे रक्षण करणे हे नियमन करण्यामागचे प्राथमिक कारण आहे. यामुळे मूल्यामध्ये घट होते कारण कंपनीला मिळू शकणारे फायदे ग्राहक आणि सरकारला मिळतात आणि कंपनीच्या भागधारकांच्या वाट्याला ते कमी उरतात. भारतातील कोल् इंडस्ट्री हे त्याचे एक उदाहरण आहे. खाण काम आणि किंमतीबाबत या उद्योगामध्ये कठोर नियमन केलेले असून खाण अधिकार फक्त कोल् इंडिया ला दिलेले होते. सरकारने नियमन केलेल्या पावर यूटिलिटी कम्पनीज हे त्याचे अजून एक उदाहरण आहे. या कंपन्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त परतावा मिळवू शकत नाहीत. ग्राहकोपयोगी वस्तू, वाहने, साहित्य आणि विद्युत उपकरणे यासारखे उद्योग कोणत्याही कठोर सरकारी नियमांशिवाय भारतात सहजपणे सुरु करता येतात आणि सहज त्याची विक्री करता येऊ शकते. नियम जितके जास्त असतील तितकी नियामक जोखीम जास्त असते कारण अशा व्यवसायांचे उत्पन्न आणि नफा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सरकारच्या नियंत्रणात असतात आणि हे मूल्य निर्मिती आणि वाढीवर प्रतिकूल परिणाम करू शकतात.

आर्थिक चक्रावरील अवलंबन

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था चक्रांमध्ये फिरते. ही व्यवस्था इतर सर्व उद्योग चक्रांपासून बनलेली असते. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) जसजसे वाढते, तसतसे उत्पादन, रोजगार आणि ग्राहकांचे उत्पन्न वाढते. यामुळे उत्पादनांची मागणी वाढते. तसेच जेव्हा सकल देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) वाढ मंदावते किंवा घसरते तेव्हा उत्पादन, रोजगार आणि उत्पन्नात घट होते. airlines,cement,metals,infrastructure, गृहनिर्माण,banking and financeही क्षेत्रे चक्रीय उद्योगांची उदाहरणे आहेत. कंस्यूमर स्टेपल्स , इनफार्मेशन एंड टेक्नोलॉजी  information technology आणि  फार्मास्युटिकल्स यासारख्या उद्योगांवर आर्थिक चक्रांचा प्रभाव बाकी उद्योगांच्या तुलनेत कमी पडतो. म्हणून ते आर्थिक चक्रांमुळे येणाऱ्या तणावाला सहज सामोरे जाऊ शकतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे ही क्षेत्रे तुलनेने अधिक स्थिर आर्थिक कामगिरी करतात आणि गुंतवणूकदार सहसा या कंपन्यांना त्यांच्या स्थिरतेमुळे जास्त मूल्यांकन देतात. या उद्योगांवर आर्थिक चक्रांचा कमी प्रभाव असल्यामुळे कंपन्यांवर मंदीचा तणाव येत नाही आणि अशा प्रकारे त्या पोर्टफोलिओचा अशा मंदी पासून काही प्रमाणात बचाव करू शकतात.

भागधारकांसाठीचा परतावा

याचे मूल्यांकन करण्यासाठी, गुंतवणूकदाराला परतावा आणि कमाईची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी विशिष्ट गुणोत्तरे विचारात घेणे आवश्यक आहे. नियोजित भांडवलावर मिळणारा परतावा (आरओसीइ) हे असेच एक गुणोत्तर आहे. यातून कंपनीची भांडवल वापरण्याची कार्यक्षमता आणि त्या भांडवलावर मिळणारा परतावा दर्शवला जातो. हे गुणोत्तर जरी एक चांगले सूचक असले तरी कंपनीने मिळवलेला निव्वळ परतावा निर्धारित करण्यासाठी भांडवलाच्या किंमतीशी त्याची तुलना केली पाहिजे. ROE इक्विटी वर परतावा] हे अजून एक गुणोत्तर येथे लक्षात घेतले पाहिजे ज्यामुळे गुंतवणुकदाराला किती नफा भागधारकाला दिला जातो आणि त्यामुळे कंपनीचे मूल्य किती प्रमाणात वाढते हे कळते. या गुणोत्तराचे मूल्यमापन इक्विटीच्या किमतीच्या तुलनेत केले जाते. इक्विटी वरील परतावा (आरओइ) जितका इक्विटी भांडवलाच्या किमतीपेक्षा (सीओइ) जास्त तितके चांगले. चलन प्रवाह /व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई (इबीआयटीडीए) यांचे देखील मूल्यांकन करणे आवश्यक आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीची संपूर्ण नफ्याचे रूपांतर रोखीच्या व्यवहारात करण्याची क्षमता तपासता येते. कमी प्रमाण हे महसूलावरील आक्रमकता ओळखण्याच्या पद्धतीचे सूचक असू शकते.

व्यवस्थापनाची गुणवत्ता

व्यवस्थापनाची गुणवत्ता हा व्यवस्थापनेचे मूल्यांकन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक मानला जातो. कार्यक्षम व्यवस्थापन संघ केवळ उद्योगासमोरील विविध आव्हाने ओळखून त्यामधून मार्ग काढून पुढे वाटचाल करतात असे नाही तर ते त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल जास्तीतजास्त आकर्षक बनवण्याचा आणि त्यांच्या व्यवसायाचे मूल्यांकन वाढवण्याचा प्रयत्न करतात. संचालक मंडळ आणि व्यवस्थापन एकमेकांपासून वेगळे आहेत अथवा नाही याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे कारण संचालक मंडळ कंपनीच्या मोठ्या निर्णयांसाठी जबाबदार असते तर दैनंदिन कामकाजाकडे लक्ष देणे हे व्यवस्थापनाचे काम असते. त्यामुळे कंपनी चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये मंडळ, प्रवर्तक, व्यवस्थापन, अल्पसंख्याक भागधारक, लेखापरीक्षक तसेच इतर भागधारक यांच्यातील संबंध आणि हितसंबंध यांचा समावेश होतो. या समतोलाची कार्यक्षम हाताळणी कंपनी प्रशासनाची क्षमता दर्शवते. कंपनी प्रशासन जितके अधिक चांगले कार्यक्षम असेल तितके कंपनीचे अल्पसंख्याक भागधारक जास्त सुरक्षित असतील आणि व्यवस्थापन भागधारकांच्या फायद्यासाठी कार्य करेल याची खात्री बाळगता येईल. वार्षिक अहवाल पाहून ह्याची खात्री करून घेता येऊ शकते. गुंतवणुकदारांनी इतर अनेक घटकांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. परंतु वर नमूद केलेले घटक दीर्घकालीन संपत्ती उभारण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी प्रमुख घटक आहेत.

सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉक्सचे तपशीलवार विहंगावलोकन

टाटा कंसल्टेंसी सर्विसेस (TCS)

आयटी क्षेत्राने दीर्घ काळात उत्तम प्रगती केली आहे आणि महामारी नंतरच्या युगात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. या क्षेत्राने गेल्या काही महिन्यांत चांगली सुधारणा केली असून मिळकत अनेक पटीत वाढवली आहे. त्यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही सध्या आघाडीवर आहे. टीसीएस चे उत्कृष्ट अंमलबजावणीचे कौशल्य, संपूर्ण पोर्टफोलिओ (सर्व विभागांमध्ये कराराचे चांगले प्रमाण) आणि उद्योगासाठी पूरक असणारे घटक (ऊर्जा आणि उपयुक्तता (इ अँड यु) आणि प्रवास आणि आदरातिथ्य उपक्षेत्रात वाढ) वाढीस समर्थन देतील. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये अमेरिकन डॉलर ६-७ बिलियन रेंजमध्ये असणा-या ऑर्डर्सचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सरासरी अमेरिकन डॉलर ७-८ बिलियन पर्यंत पोचले. मूळ ऑर्डर्स चे प्रमाण दर वर्षी वाढते. यामध्ये कोणत्याही अधल्यामधल्या मोठ्या ऑर्डर्सचा समावेश नाही. अविरत दीर्घकालीन वाढीसाठी उच्च मूल्य गुंतवणूकीसह महसुलाची गुणवत्ता वाढत राहते.  २६.६% निव्वळ फायदा झाला जो या उद्योगामध्ये सर्वाधिक आहे. नियोजित भांडवलावर मिळणारा परतावा (आरओसीइ) ५४.९% तर इक्विटी वरील परतावा (आरओइ) ४३.६% आहे. शिवाय त्याचा ५ वर्षांचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) मधील मिळकत आणि नफा अनुक्रमे १०% आणि ८% आहे. उपयोगात सुधारणा, कार्यप्रणाली आणि प्राप्ती, उपकंत्राट खर्चावरील नियंत्रण आणि कर्मचारी सोडून जाण्याचे कमी प्रमाण हे महत्त्वाचे घटक आहेत जे अल्पावधीत नफा वाढायला मदत करतील. सध्याचे जागतिक अर्थशास्त्र आणि चलनातील किंमतीतील चढ उतारामुळे निर्माण होणारी आर्थिक अस्थिरता या कंपनीसाठी धोक्याच्या ठरू शकतात.

आईसीआईसीआई बैंक

आयसीआयसीआय बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च बँकांपैकी एक आहे. ३१ मार्च २०२२ रोजी बँकेची एकत्रित एकूण मालमत्ता १७.५ लाख कोटी रुपये होती. भारतात बँकेच्या एकूण ५४१८ शाखा आणि १३,६२६ एटीएम आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये श्री. संदीप बक्षी रुजू झाल्यानंतर बँकेमध्ये परिवर्तन घडू लागले आहे. बँकेने तिच्या अंतर्गत कार्यप्रणाली मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे आणि हे बँकेच्या सुधारित मालमत्तेच्या गुणवत्तेवरून स्पष्ट होते. आर्थिक वर्ष १८ मध्ये बँकेची एकूण फायद्यात नसलेली मालमत्ता (जीएनपीए) ८.८४% होती आणि आता आर्थिक वर्ष २२ मध्ये ती ३.८% आहे. आयसीआयसीआय बँकेने गेल्या ६ वर्षांत व्यावसायिक ग्राहकांवरून आता किरकोळ ग्राहकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कर्जामध्ये कमी जोखीम आणि जास्त परतावा मिळायची संभावना निर्माण झाली आहे. बँकेचे किरकोळ ग्राहक आर्थिक वर्ष १३ मध्ये ३७% होते ते आर्थिक वर्ष २२ मध्ये वाढून आता ६२% झाले आहेत. कर्जाच्या प्रकारातील बदल आणि बँकेच्या एकूण फायद्यात नसलेल्या मालमत्तांमधील घट यामुळे बँकेच्या निव्वळ व्याजाच्या प्रमाणात (एनआयएम) सतत वाढ होत आहे. गेल्या ३ वर्षात बँकेचे निव्वळ व्याजाचे प्रमाण (एनआयएम) ३.१९% वरून ४% पर्यंत पोचले आहे. यामुळे इक्विटी वरील परतावा (आरओइ) आर्थिक वर्ष २१ मधील ८.८% वरून १५% वर पोचला आहे. आर्थिक वर्ष २२ मधील उद्योग क्षेत्रातील वाढ ९.६% पर्यंत पोचली असल्याने बँकिंग क्षेत्राचे आता चांगले दिवस येत आहेत. आयसीआयसीआय बँक ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असल्याने वाढत्या मागणीचा या बँकेला जास्त फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २२ मध्ये कर्जवाटपात १८%नी वाढ झाल्यामुळे हे स्पष्ट होते. बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत योग्य सुधारणा, किरकोळ ग्राहकांवर दिलेले अधिक लक्ष आणि भरघोस निव्वळ नफा यामुळे येत्या काही वर्षात मिळकती मध्ये अजून चांगली सुधारणा होण्याची संभावना आहे. तथापि, मालमत्तेची गुणवत्ता टिकवणे हा दीर्घ काळातील एक महत्त्वाचा घटक आहे.

बजाज फाइनेंस

अबँकीय वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ग्राहक कर्ज, सुवर्ण कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादींचा समावेश असतो. परंतु लोकांकडून ठेवी घेत नसल्याने हे क्षेत्र बँकांपेक्षा वेगळे असते. या कंपन्या एका संस्थेकडून पैसे उधार घेऊन ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे त्यांना कर्ज देणे आणि कर्ज घेणे यातील व्याज दरातील फरकामुळे फायदा होतो. देशाच्या निव्वळ प्राप्तीमध्ये वाढ झाल्यामुळे आणि लोकांचा जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा वापरण्याकडे कल असल्यामुळे या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. बजाज फायनान्स प्रामुख्याने ग्राहकांना कर्ज देण्यामध्ये कार्यरत आहे. हि कंपनी ग्राहकांना वैयक्तिक वापरासाठी कर्ज देते. कर्ज देण्याची प्रक्रिया सुरु केल्यामुळे, वेगाने त्यात काम वाढवल्यामुळे आणि कंपनीच्या देशभर पसरलेल्या विस्तृत जाळ्यामुळे कंपनी मध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. बजाज फायनान्सच्या उत्तम कामगिरी मध्ये वैविध्यपूर्ण उत्पादन मिश्रण, कामाचा विस्तृत व्याप, दूरदर्शी कर्ज व्यवस्था, कार्यक्षम व्यवसाय खर्च आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापन या घटकांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २२ मधील १४६,७४३ कोटी रुपयांची स्वतःची व्यवस्थापनातील मालमत्ता (एयुएम) आणि १९७,४५२ कोटींची एकत्रित व्यवस्थापनातील मालमत्ता (एयुएम) यासह कंपनी आज देशातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण अबँकीय वित्तीय कंपनी (एनबीएफसी) पैकी एक म्हणून उदयास आली आहे. कंपनीने गेल्या ५ वर्षांत ३०.८% चक्रवाढ वार्षिक वाढ दाराच्या (सीएजीआर) निव्वळ नफ्यात १७.७% इक्विटी वर परताव्याची (आरओइ) चांगली वाढ केली आहे. त्याच कालावधीत एकत्रित आधारावर व्यवस्थापनातील मालमत्तेचा (एयुएम) चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) २४.४१% नी वाढला आहे. भरपूर नफा आणि एकत्रित व्यवस्थापनातील मालमत्तेत (एयुएम) वाढ होऊन देखील,आर्थिक वर्ष २२ मध्ये व्यवसायाची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे (एकत्रितपणे), तसेच उपयोगात नसलेली मालमत्ता निव्वळ ०.६८% असून हे प्रमाण या उद्योगामध्ये सर्वात कमी आहे. यावरून कर्जे फेडण्याची योग्यता दिसून येते. बजाज फायनान्स मालमत्तेपेक्षा कर्ज जास्त काळासाठी ठेवत असून ते बँका, अर्थ बाजार, बाह्य व्यावसायिक कर्जे आणि ठेवी यांच्याकडून घेणाऱ्या कर्जाचा उत्तम समन्वय साधत असल्यामुळे कंपनीच्या निव्वळ व्याज नफ्यामध्ये (एनआयआय) चक्रवाढ वार्षिक वाढ दराप्रमाणे (सीएजीआर) ३५% वाढ झाली आहे (१५ वर्षे). कर्ज परतफेड न करणाऱ्या ग्राहकांपासून कंपनीला धोका असतो, परिणामी कंपनीची एकत्रित व्यवस्थापनातील मालमत्तेची (एयुएम) गुणवत्ता खालावते. व्याज दर चक्रातील बदलामुळे आणखी एक जोखीम उद्भवू शकते, ज्याचा परिणाम कंपनीच्या निव्वळ व्याजाच्या प्रमाणावर (एनआयएम) आणि पर्यायाने मिळकतीवर होऊ शकतो. कंपनीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी गुंतवणूकदारांनी व्याजदराचे स्वरूप तसेच एकूण आर्थिक स्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

गोदगरेज कंस्यूमर्स प्रोडक्ट लिमिटेड (GCPL)

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) हा १२५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गोदरेज ग्रुपचा एक भाग आहे. कंपनीने त्यांची गुणवत्ता वर्षानुवर्षे सातत्याने टिकवल्यामुळे उत्कृष्ट प्रतीची उत्पादने सहज परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा जीसीपीएल मध्ये समावेश आहे. परंतु या देशांमधील आघाडीचे विभाग, उदाहरणार्थ घरगुती कीटकनाशके, हवेची निगा आणि केसांचा रंग, हे अजून अविकसित आहेत आणि यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी भरपूर वाव आहे. या सर्व विकासासाठी कंपनीला त्यांची खात्रीशीर रणनीती वापरून मूल्य निर्मिती करण्याची हि एक मोठी संधी मिळाली आहे. या श्रेणी मधील आघाडीची कंपनी असल्याने नावीन्यपूर्ण विकासात वाढ करणे आणि त्या श्रेणींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे हे कंपनीचे धोरण आहे. नवीन एमडी आणि सीइओ, श्री. सुधीर सीतापती यांनी अवलंबलेल्या नवीन धोरणांमुळे आणि तत्वज्ञानामुळे कंपनीची विलक्षणीय क्षमता दिसून येईल आणि कंपनी प्रगतीपथाच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल. त्यांचा धोरणात्मक दृष्टिकोन आणि उत्कृष्ट अंमलबजावणीची क्षमता याचा कंपनीवर सकारात्मक प्रभाव पडू लागला आहे. उत्पादन वाढीला त्यांनी मुख्य प्राध्यान्य दिले आहे. जीसीपीएल इंडोनेशियामध्ये घरगुती कीटकनाशके आणि व्यवसायाची वाढ तर आफ्रिकेत नफा आणि प्रशासन यावर लक्ष केंद्रित करेल. कंपनीच्या नवीन धोरणाला सर्वाधिक महत्त्व असल्याने तिच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात बदल घडून येण्याची तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मध्यम मुदतीत उत्पादनात दुहेरी-अंकी वाढ हि कंपनीचे महत्त्वाकांक्षी धोरण आहे. तथापि, बाजारातील स्पर्धात्मक परिस्थिती आणि बाजारात नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे उत्पादनाची किंमत आक्रमकतेने ठरवण्याचे धोरण स्वीकारावे लागू शकते.  याव्यतिरिक्त कच्च्या मालाच्या किंमतीतील चढउताराचा देशील ह्यावर परिणाम होऊ शकतो.

आयटीसी लिमिटेड

आयटीसी सिगारेटपासून ते खाद्यपदार्थ आणि स्टेशनरीपर्यंत अनेक ग्राहक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. सिगारेटच्या विक्रीतून कंपनी सुमारे ४३% कमाई करते आणि कंपनीचा सिगारेट मध्ये सर्वात जास्त बाजार हिस्सा (भारतात ७५% पेक्षा जास्त) आहे. सिगारेट बाजारात वाढीची संधी आहे कारण असंघटित बाजार आता संघटित होत आहे. त्यामुळे बाजारपेठांचे एकत्रीकरण होईल आणि आयटीसीला बाजारातील मोठा हिस्सा मिळेल. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून, भारतातील एकूण तंबाखूच्या वापरा पैकी कायदेशीर सिगारेटचा वापर केवळ ८% आहे. जागतिक सरासरी ९०% असल्याने या क्षेत्रात वाढीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. कंपनीचा दुसरा सर्वात मोठा विभाग एफएमसीजी आहे, जिथे कंपनी सर्वाधिक उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीची सर्वोच्च वाढ या विभागात झाली आहे. एचयूएल, नेस्ले आणि ब्रिटानिया सारख्या कंपन्या स्पर्धेत असूनही आयटीसीचा विस्तार वेगाने होत आहे. व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले गट, वाढत असलेले निव्वळ उत्पन्न आणि ग्राहक जागरूकता, बाजारात ग्राहकोपयोगी वस्तूंचा कमी शिरकाव, अनुकूल लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण हे एफएमसीजी च्या दीर्घकालीन वाढीसाठी पूरक आहे. कंपनी द्वारे विकल्या जाणार्‍या इतर उत्पादनांमध्ये कृषी उत्पादने, कागद उत्पादने आणि आयटी सोल्यूशन्स यांचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीची कार्यक्षमता खूप वाढली असून नफा आणि महसुलात ८% वाढ तसेच चक्रवाढ वार्षिक वाढ दरामध्ये (सीएजीआर) ७% वाढ झाली आहे. सरासरी ५ वर्षात इक्विटी वरील परतावा (आरओइ) २३% असून त्याच कालावधीत नियोजित भांडवलावर मिळणारा परतावा (आरओसीइ) ~३३% आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ३.४६% लाभांश देशील दिला आहे. परंतु कंपनीला सिगारेट उद्योगाच्या निर्बंधांचा सामना करावा लागतो. आयटीसीच्या उत्पादनांची किंमत, महसूल आणि वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. उद्योगात तीव्र स्पर्धा असल्यामुळे प्रतिस्पर्धीं कडून देखील कंपनीला जोखीम आहे. म्हणून कंपनीने वेळोवेळी धोरणांमध्ये योग्य ते फेरफार केले पाहिजेत.

सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉक्स कसे निवडायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा

सर्वोत्तम दीर्घकालीन स्टोक्सचा नमुना पोर्टफोलिओ

१५ सप्टेंबर २०२२ पासून दीर्घ मुदतीसाठी सर्वोत्कृष्ट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या पोर्टफोलिओसाठी एकूण ₹५३,८०३ ची आवश्यकता आहे. सॅमको हि भारतातील ब्रोकरेज मध्ये सर्वात जास्त सूट देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही चालू किंमती बघू शकता आणि भारतातील सर्वोत्तम लार्ज-कॅप स्टॉक्स मध्ये सर्वात कमी ब्रोकरेज मध्ये व्यापार करू शकता. मोफत डीमॅट खाते ट्रेडिंग आजच उघडा!!
कंपनीचे नाव वेइटज  सीमपी  (26 Dec 22) नो ऑफ़ स्टॉक्स  अमाउंट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 23%  ₹ 3,253 4  13,012
आयसीआयसीआय बँक 20%  ₹ 892 13  11,596
बजाज फायनान्स 34%  ₹ 6,434 3  19,302
गोदरेज कन्स्युमर प्रॉडक्ट्स 11%  ₹ 878 7  6,146
आयटीसी 13%  ₹ 335 22  7,370
100%  57,426 
 

खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दीर्घकालीन स्टॉक्स:विविध मुद्यांसह तपशीलवार माहिती

सॅमको हि भारतातील ब्रोकरेज मध्ये सर्वात जास्त सूट देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही चालू किंमती बघू शकता आणि या अथवा इतर लार्ज-कॅप स्टॉक्स मध्ये सर्वात कमी ब्रोकरेज मध्ये व्यापार करू शकता. मोफत डीमॅट आणि ट्रेडिंग खाते आजच उघडा!!
क्र. क्र कंपनीचे नाव एन एस ई कोड बी एस ई कोड सीएमपी (26 Dec'22) उद्योग रेटिंग मार काप Rs.Cr. नेट वर्थ Rs.Cr. P/E OPM % ROE % ROCE % सेल्स वार  5Yrs % प्रॉफिट वार  5Yrs % डेब्ट  / इक्विटी  CMP / BV CMP / Sales
1 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस 532540 3,253 आयटी कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर 5 1,190,640 97,454 30.1 26.6 43.6 54.9 10.2 7.83 0.08 12.2 5.74
2 आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआयबँक 532174 892 बँक 4 622,363 181,790 21 20.7 14.8 5.59 9.38 19.8 6.89 3.41 5.97
3 बजाज फायनान्स बजफायनान्स 500034 6,434 वित्त (एनबीएफसी सह) 5 389,836 48,043 39.3 67.4 17.5 10.3 26 30.9 3.81 8.11 10.7
4 गोदरेज कन्स्युमर प्रॉडक्ट्स गोदरेजसीपी 532424 878 वैयक्तिक उत्पादने 3 89,685 12,678 55.4 17.2 17 18.5 5.78 6.59 0.09 7.08 7.04
5 आयटीसी आयटीसी 500875 335 सिगारेट आणि एफएमसीजी 4.5 415,699 65,623 24.1 34 24.8 33.6 7.23 8.3 0 6.32 6
6 कॅपलीन पॉईंट लॅब्स कॅपलीपॉईंट 524742 707 फार्मास्युटिकल्स 3 5,352 1,686 16.2 29.8 22.4 28.7 25.9 25.6 0 3.18 3.9
7 मारिको मारिको 531642 518 वैयक्तिक उत्पादने 4.5 67,030 3,753 54.4 18.1 36.6 42.7 9.96 9.94 0.14 17.8 6.97
8 अवंती फीड्स अवंतीफीड 512573 385 इतर अन्न उत्पादने 2 5,252 1,929 20.6 6.75 11.7 17.3 14 -0.06 0 2.73 0.99
9 एचसीएल टेकनॉलॉजिज एचसीएलटेक 532281 1,032 आयटी कन्सल्टिंग 4 279,928 61,241 20.3 22.4 22 25.4 12.5 9.36 0.11 4.57 3.01
10 बजाज ऑटो बजाजऑटो 532977 3,557 दुचाकी आणि तीनचाकी 5 102,871 26,036 18.4 16.4 19 23.4 8.79 5.87 0 3.95 2.92
11 केइआय इंडस्ट्रीज केइआय 517569 1,489 इलेक्ट्रिक उपकरणे आणि उत्पादने 0.5 13,438 2,344 31.4 9.94 19.2 23.8 16.8 32 0.08 5.73 2.06
12 पॉलिकॅब इंडिया पॉलिकॅब 542652 2,587 इलेक्ट्रिक उपकरणे आणि उत्पादने 3 38,757 5,833 34.5 11.7 17.3 22.5 17.3 30.8 0.02 6.63 2.89
13 कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल 506395 873 खते 3 25,621 7,425 13.4 10.6 26.6 34.7 13.8 26.4 0.22 3.45 1.02
14 एम्फसिस एम्फसिस 526299 1,916 आयटी कन्सल्टिंग 3 36,194 6,977 23.1 17.6 21.2 27.4 14.5 12.3 0.15 5.17 2.71
15 अलेम्बिक फार्मा एपीएलएलटीडी 533573 582 फार्मास्युटिकल्स 0.5 11,400 5,120 42.8 12 10.1 10.9 11.3 5.13 0.15 2.23 2.1
16 ओरॅकल फायनान्शिअल सर्विसेस सॉफ्टवेअर ओएफएसएस 532466 3,004 आयटी कन्सल्टिंग 4 25,974 6,433 14.4 44.2 27.1 36 3.36 9.07 0.01 4.03 4.88
17 टाटा एलक्सी टाटाएलक्सी 500408 6,257 आयटी सॉफ्टवेर 3 38,964 1,692 58.2 32 37.2 47.7 14.8 25.9 0.11 23 13.9
18 डिक्सन टेक्नॉलॉजीस डिक्सन 540699 3,829 उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स 2 22,820 1,112 98.4 3.65 21.9 22.5 34.2 31.7 0.37 20.4 1.79
19 हिंदुस्तान एरोनॉटिक्स एचएएल 541154 2,527 एरोस्पेस 0.5 84,515 20,852 14.4 24.3 29.4 30.5 6.52 14.2 0 4.05 3.22
20 एपीएल अपोलो ट्यूब्स एपीएलअपोलो 533758 1,059 लोखंड आणि पोलाद 3 29,373 2,634 53.4 6.02 28.2 34.7 27.2 29.7 0.36 10.1 1.98
 

Download App to know your Andekha Sach

Get the link to download the app.

QR
Google Play Store App Store
Samco Fast Trading App

Leave A Comment?